तीनही लोकांचा राजा
आईविना होतो भिकारी
होऊन सारे वजा
उरल्या फक्त आठवणी
भूक, ठेच, वेदना
झेलताना मुखात “आई”
आता साद घालाया
शब्द जिभेवर नाही
गरजा, अडचणी, दुःख
घेणारी तू ओंजळीत
राहून सदा हसतमुख
मग आज का निजलीस?
प्रत्येक श्वासात बंधला
तू दिलेला प्राण
कुठे फेडू हे ऋण?
माझे मन मौन
कुठल्यातरी पूर्वीच्या जन्माचं
पुण्य असेल कदाचित
लाभलं तुझं छत्र
जन्मलो तुझ्या कुशीत
कुठल्यातरी पूर्वीच्या जन्माचं
पापच असेल कदाचित
मुकलो तुझ्या देहास
चिताही तुझी शीत