बाजी

घोडखिंड मी उभा |
बाजूस बसली शांतता ||
काळोखात माझा माथा |
तेव्हा अनुभवली गाथा ||

सोडून गड पन्हाळा |
तोडून मृत्यूचा सापळा ||
जोडीस अभय मावळा |
पाहतो सर्जा चालला ||

चुरडाया स्वराज्य आली |
आदिलशाही हुकूम पाळती ||
मागे फौज बिजापुरी |
संगे मसूद सिद्दी ||

राजाला कळून चुकलं |
नाही थोपवून धरलं ||
तर जीव मुकेल |
मुलुख राहील भुकेलं ||

घेतला प्रण एकानं |
राहील खिंडीत टिकून ||
अंगात हत्तीचं बळ |
त्याचं हिरडस मावळ ||

नजरेत शिवाच्या गड |
वाट भलती अवघड ||
उडवायास शत्रूची धिंड |
तयार बाजीची खिंड ||

आले तीन प्रहार |
झाला घोर संहार ||
ताठ बाजी रक्तबंबाळ |
रोखून धरला काळ ||

असा मावळा व्यापला |
खिंडीतून पार जाया ||
पाखरू सुद्धा निषिद्ध |
झाली हार-जीत सिद्ध ||

वाट सिद्दी पाहतो |
बाजी केव्हा पडतो ||
नेण्यास यम येतो |
हात लावाया कापतो ||

त्राण नव्हता भरपूर |
“कुठं राजाचं पाऊल?” ||
विचार करतो शूर |
आले तोफेचे सूर ||

आखरी घाव झोकून |
मग घातले आलिंगन ||
कथा अनंत सांगीन |
रात्रीत झालो “पावन” ||

Read the English version here

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.